HW News Marathi
महाराष्ट्र

“हम तब भी आपके साथ रहेंगे”, छगन भुजबळ आणि राज्यपालांमध्ये रंगली जुगलबंदी

नाशिक | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात नाशिकमधील कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. “राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत येत्या २ वर्षांत सर्व इमारती बांधा, अशी कोपरखळी छगन भुजबळांनी मारली, त्याला लागलीच राज्यपालांनीही उत्तर दिले आहे. तब तक क्या सिन रहेगा?, भुजबळ म्हणाले, हम तब भी आपके साथ ही रहेंगे” या दोघांच्या जुगलबंदीनं व्यासपीठावर एकच हशा पिकला होता.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण करून संपन्न झाले. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आदी उपस्थित होते.

कोरोना के भय से मत डरो, डटके सामना करो, असा सल्लाही राज्यपालांनी यावेळी नागरिकांना दिला आहे. भारतीय पुरातन पॅथी, इम्युनिटी वाढविण्यासाठी गुणकारक आहे. याचं संशोधन आणी जनजागृती करावी. सोलर ऊर्जेवर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना, प्रोत्साहन दिलं. नरेंद्र मोदी यांनी सोलर ऊर्जानिर्मितीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिल्याचंही राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी अधोरेखित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंना दणका, सिंधुदुर्गातील 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

News Desk

राणा दाम्पत्याची एकाच FIR मध्ये सर्व कलम टाकण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कामगार संघटनांनी दिली संपाची हाक

Aprna