HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना-भाजप युतीवरून चंद्रकांत खैरेंचा अब्दुल सत्तार यांना घरचा आहेर

औरंगाबाद | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला, तर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपची युती होऊ शकते, असे विधान शिवसेना नेते व राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (४ जानेवारी) केले. यावरून आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत अब्दुल सत्तार यांना खडेबोल सुनावले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच युतीचा निर्णय घेतील. त्यामुळे सत्तार यांना युतीबाबत बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत खैरेंनी सत्तार यांना फटकारलं आहे.

युतीविषयी केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच विधान करू शकतात. तसेच युतीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांनाच आहे. युती होणार की नाही याबद्दल हे दोनच नेते बोलू शकतील. त्यामुळे मंत्री असताना, असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. सत्तार यांनी ओघाओघाने तसे विधान केले असेल. परंतु, त्यांना तो अधिकार नाही, अशा प्रकारे खैरेंनी सत्तार यांचा समाचार घेतला. 

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचे संबंध जगजाहीर

खैरे म्हणाले, “राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे चांगले काम करत आहे. आमचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचे संबंध हे जगजाहीर आहेत,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.”

अब्दुल सत्तार विरुद्ध चंद्रकांत खैरे; जुना वाद

अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांचा वाद तसा जुनाच आहे. सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना खैरे आणि सत्तार हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्यानंतर सत्तार यांनी जरी शिवसेनेत प्रवेश घेतला असला तरी त्यांच्यातील वाद आजही दिसून येतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिलायन्सकडून मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीत ५ कोटींची मदत

swarit

१०वी, १२वी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

News Desk

मुलांच्या शाळा शुल्कासाठी सीएसआर व देणगीतून तोडगा काढणार! – उपमुख्यमंत्री

Aprna