HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भावावर अॅट्रॉसिटी व फसवणूकीचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

सांगली | नेहमीच चर्चेत असणारे भाजप नेते व आमदार गोपीचंद पडळकर आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर यांच्यावर आटपाडी तालुक्यातील झरे येथे जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी आज (५ जानेवारी) आटपाडी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी झरे येथील ज्येष्ठ शेतकरी महादेव अण्णा वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पडळकर बंधूंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०११ साली त्यांचा गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधूंसोबत ६ लाख २० हजार रुपयांचा जमीन खरेदीचा व्यवहार झाला होता. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सुरुवातील पडळकरांनी १ लाख ६० रुपये वाघमारे यांना दिले. मात्र, उर्वरित रक्कम ३ ते ४ महिन्यात देऊ असे सांगितले व जमीनीची बनावट कागदपत्रे तयार करुन जमीन आपल्या नावावर करुन घेतली असल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच फिर्यादी वाघमारेंच्या मालकीच्या विहीरीतील पाण्यावर व विहीरीच्या वीज कनेक्शनवर अतिक्रमण केले असल्याचा आरोप करत त्यांनी पडळकरांवर फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी २००८ साली झालेल्या चर्चेत पडळकर आणि त्यांचे भाऊ यांनी अकरा एकर शेतजमीन १० लाख ५० हजार रुपयांना खरेदी घेण्याचे तोंडी ठरले. त्यापैकी 1 लाख हे ११ ऑगस्ट २००८ पूर्वी दिले होते. त्यानंतर खरेदी दस्त करताना स्टॅम्प ड्युटी फीच्या पार्श्वभूमीवर येणारा खर्च कमी करुन कमी किंमतीत जमीन घेतल्याचे दाखवले. प्रत्यक्षात वेळोवेळी ४ लाख व खरेदी दस्तावेळी ७५ हजार असे एकूण ५ लाख ७५ हजार रुपये दिले. परंतु, ४ लाख ७५ हजार अद्यापही दिले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रम्हदेव पडळकरांवर फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसारही (अ‍ॅट्रासिटी) गुन्हा दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पक्का, पहा कुणाची खुर्ची आहे धोक्यात ?

News Desk

वनमंत्री संजय राठोड मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रिमंडळ बैठकीला लावणार हजेरी

News Desk

कितीही प्रयत्न केले तरी मुंबईपासून बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, सुप्रिया सुळेंचा आदित्यनाथांना इशारा

News Desk