HW News Marathi
महाराष्ट्र

मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं, चंद्रकांत पाटलांचे त्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण

मुंबई |राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं,” अशा शब्दांत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?”

“मी कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही. सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांकडून याबाबत भीती निर्माण केली जाते आहे. कालच्या ओबीसी मेळाव्यात यासंदर्भात बोलताना मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. पण तुम्ही मोदींबद्दल आणि माझ्याबद्दल बोलतात ते चालतं का? मी उद्धव ठाकरेंबद्दलही बोलतो. त्याबद्दल कधी शिवसेना बोलली नाही, राजकारणात असं बोललं जातं. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलू दे!” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी एका मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किनगाव येथील अपघाताची केंद्र आणि राज्य सरकारकडून दखल, मृत आणि जखमींना जाहीर केली आर्थिक मदत

News Desk

राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

News Desk

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची बार्टीच्या विद्यार्थ्यांप्रति दिसली उदासीनता! – प्रीतम मुंडे

Aprna