HW News Marathi
देश / विदेश

“शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून ५४ आमदारांची यादी चोरणं कोणत्या नैतिकतेत बसतं ?”

मुंबई । राज्यात प्रचंड गाजलेल्या ‘पहाटेच्या शपथविधी’वरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात सुरू असलेले शाब्दिक युद्ध काही संपण्याचे नाव घेत नाही. कारण, चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला आहे. “शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून ५४ आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते आम्हाला शहाणपणा शिकवतात?”, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर उपस्थित केला आहे. दरम्यान, यावर आता अजित पवार नेमकी काय प्रतिक्रिया देणार ? हे पाहणे महत्त्वाचे

चंद्रकांत पाटील अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, ‘सगळे झोपेत असताना राज्यातील सरकार पडेल’ असे आम्ही म्हटल्यानंतर अजित पवारांनी काहीही बोलण्याची गरज नव्हती. कारण मी काही त्यांना उद्देशून काहीही बोललो नव्हतो. परंतु, अजित पवारांनी त्यावर आमची चेष्टा केली. आता ते बोलले तर मलाही बोलावेच लागणार. वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृतीच आहे. एखाद्या गोष्टीला १४ महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून ५४ आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते आम्हाला शहाणपणा शिकवतात?”, असा अत्यंत बोचरा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

अजित पवार काय म्हणाले होते ?

“अजित पवारांना फक्त सत्ता स्थापन करता येते, पण टिकवता येत नाही”, अशी टीका नुकतीच चंद्रकांत पाटलांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी आता पलटवार केला आहे. “विरोधकांना काही कामधंदा नाही. त्यामुळे ते जुनी गोष्ट उकरून काढत आहेत”, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार आज (६ जून) माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करणे, राष्ट्रवादीसोबत जाणे ही माझी चूक होती. त्यामुळे माझ्या प्रतिमेला धक्का बसला, अशी कबुली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका मुलाखतीत दिली. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाकयुद्ध सुरू झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेलची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत | महाधिवक्ता

News Desk

Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय-बच्चन यांना EDकडून समन्स

Aprna

संसदेत चाकू घेऊन प्रवेश करण्याचा अज्ञात व्यक्तीचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk