HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे खास नेता ईडीच्या रडारवर; चंद्रकांत पाटलांनी घेतलं नाव

नाशिक | महाविकासआघाडीच्या नेत्यांवर सध्या ईडीचं सावट आहे, असं विरोधी पक्षाकडून बऱ्याच वेळा म्हटलं जातंय. सध्या अनिल देशमुख, एकनाथ खडसे व प्रताप सरनाईक या नेत्यांची वेगवेगळ्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. याच मालिकेत आता परिवहन मंत्री अनिल परब व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची भर पडली आहे. या दोघांच्याही बंगल्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असून त्याची चौकशी सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या नाशिक मध्ये कोरोना रुग्णांचा आढावा घेत आहेत. महाविकासआघाडी मधल्या नेत्यांवर ईडीच्या कारवाई बदल ते म्हणाले, ‘अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. अजित पवार व अनिल परब यांची सीबीआय चौकशी व्हावी म्हणून न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. नितीन राऊत यांनाही एका प्रकरणात कोर्टानं फटकारलं आहे. संजय राठोड यांचंही प्रकरण प्रलंबित आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या निमित्तानं इतर कारखान्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी मी स्वत: केलीय. यापूर्वी अण्णा हजारेंनीही अशी मागणी केलीय. अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीनं सील केलीय. हे सगळं सुरू असल्यानं एका नेत्याला अटक होईल असं म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची चौकशी सुरू आहे, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.

अजित पवार आणि अनिल परब यांच्या चौकशीसाठी कोर्टात याचिका

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची नावे आपल्या जबाबात घेतली असून या दोघांवर गुन्हा दाखल करून, CBI कडे चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड. रत्नाकर डावरे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तांत्रिक बिघाडामुळे बाधित सर्व भागांचा वीजपुरवठा झाला सुरळीत

News Desk

कोलंबकरांना अनेक जण ‘हे बंधन बांधा, ते बंधन बांधा’ सांगत होते !

News Desk

“आपल्याला संपवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना…”, नाना पटोलेंचा सूचक इशारा

News Desk