HW News Marathi
व्हिडीओ

अमृता फडणवीसांनी शिवसेनेला दाखवला ठेंगा

मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे चेंबूर, हिंदमाता, सायन, कुर्ला यांसारख्या अनेक सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साचलेलं पहायला मिळालं. याचा रस्ते वाहतूकीवर मोठा परिणाम पाहिला मिळाला. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं होतं. पावसाचा फटका मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनला देखील बसला. यामध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. याच मुद्दयावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन मुंबई महापालिकेच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. साचलेल्या पाण्यात उभं राहून अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. आणि यात त्यांनी म्हटलंय, ‘या शहराच्या प्रत्येक वळणावर खड्डे सापडतील, पण शोधलं तर एक गुन्हेगारही सापडणार नाही’. या ट्विटच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.

#AmrutaFadnavis #UddhavThackeray #Shivsena #rain #mumbai #maharashtra #aadityathackeray #devendrafadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टपाल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

News Desk

शिंदेंच्या दसरा मेळाव्याला भाजप नेते का नाही येणार?

Manasi Devkar

Maharashtra Winter Session। सावरकर अन् शिवस्मारकातील भ्रष्टाचारामुळे गाजला अधिवेशनाचा पहिला दिवस

Gauri Tilekar