HW News Marathi
महाराष्ट्र

‘मंदा म्हात्रेंच्या विधानावर आता चंद्रकांत पाटलांचं उत्तर! म्हणाले….’

जालना | भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या एका विधानामुळे आता राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. मंदा म्हात्रे यांनी पक्षात महिलांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. तसेच पक्षात महिलांना डावललं जात आहे, असं म्हटलं होतं. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदा म्हात्रेंशी संवाद साधून त्यांचं म्हणणं ऐकून घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

तर त्यांच्याशी बोलू

चंद्रकांत पाटील यांनी मंदा म्हात्रे यांच्या विधानावर आपलं मत दिलं आहे. “भाजपमध्येच अशा प्रकारे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचं वातावरण आहे. मंदाताईंना स्वत:ला काही अनुभव आले असतील तर त्यांच्याशी बोलू. आमच्यासारख्यांचा प्रवास त्यासाठीच आहे. आज तुम्ही बघितलं, मी कार्यकर्त्यांना भेटलो त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यामुळे कार्यकर्त्याला मोकळेपणाने बोलायला लावणं आणि त्याच्या बोलण्यातून आलेल्या समस्या सोडवणं ही आमची कार्यपद्धती आहे. मंदाताई आणि देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत चांगला संवाद आहे. त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेऊ”, असं पाटील म्हणालेया आहेत.

काय म्हणाल्या मंदा म्हात्रे?

राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं

मंदा म्हात्रे यांनी त्यांच्याच पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ““राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं. दोनदा निवडून येऊनही मला आजही संघर्ष करावं लागतोय. आजही महिलांना राजकारणात काम करताना संघर्ष करावा लागतो. एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. आज ही महिलांची कामे झाकून टाकण्याचं काम केलं जातं. मला तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी लढणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

“आपल्याच पक्षातील माणसं, जर एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली, तर मग त्याला भीती निर्माण होते, मग भीती निर्माण झाल्यावर फोटो टाकायचं नाही, कार्यक्रमाला बोलवायचं नाही, अशी जेव्हा भीती निर्माण होते, तेव्हा समजायचं आपलं कार्य चांगलं आहे. लक्षात घ्या महिलांनो. ज्यावेळी तुमचा फोटो टाकायचा असेल तेव्हा त्यांच्या मनात भीती निर्माण झाली तर समजायचं तुमच्या कार्याने धडकी निर्माण झाली आहे. काम करताना, कुठलीही भीती बाळगायची नाही, फळाची अपेक्षा बाळगायची नाही, आपण आपलं काम करत राहायचं”, असं मंदा म्हात्रे म्हणाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका, पण मतदान काँग्रेसलाच करा’

News Desk

आज दिवसभर अशाच बातम्या येतील !

swarit

‘सामना’च्या संपादकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर रश्मी ठाकरेंनी भाजपच्या ‘या’ नेत्यावर केली टीका

News Desk