HW News Marathi
महाराष्ट्र

आघाडी सरकारने वेगवेगळे लढा, चंद्रकांत पाटील यांचे ओपन चॅलेंज…! 

मुंबई | २०१४ सालची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवून दाखवावी. मग कुणाला जास्त जागा मिळतात ते पाहू, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. आघाडी सरकार स्थापन करत कोण कोणाचा बाप आहे हे सगळ्यांना माहीत आहे असे अमोल मिटकरी म्हणाले. . २०२२ साली मनपा निवडणुकीत पुण्याची जनता अजितदादा पवार हे तुमचे बाप आहेत, हे सिद्ध करून दाखवेल. काळजी करू नका, असे वक्तव्य मिटकरी यांनी केले होते.

यावर आता चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खुले आव्हान दिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार येऊनही विश्वासघात झाल्यामुळे आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही. त्यावेळी सत्तास्थापनेसाठी घडलेला प्रकार भारतीय संस्कृतीला साजेसा नाही. दगा देऊन काहीही होऊ शकते. मात्र, तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात उतरुन योग्यप्रकारे लढा, असे चेलेंज आघाडी सरकारला दिले आहेत. २०२२ कशाला २०२४ च्या विधानसभेलाही माझे ओपन चॅलेंज आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळे लढावे. आम्हीदेखील स्वबळावर लढू. मग कोणाला किती जागा मिळतात, ते पाहू, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालनियुक्त १२ जागांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर, राज्यपालांकडे लवकरच पाठवणार प्रस्ताव

News Desk

“मी हल्ल्याचं समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे”, राम कदमांची ती ऑडिओ क्लिप वायरल 

News Desk

‘काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही’, काँग्रेस नेत्याची पवारांवर टीका

News Desk