HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | दूध दरवाढीसाठी भाजप १ ऑगस्टला आंदोलन करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते कोल्हापुरात बोलत होते. टीव्ही ९ मराठी वाहिनीशी बोलत असताना त्यांनी माहिती दिली. आघाडी सरकारमधील घटकांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे, असा टोला देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

“महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे. सरकार आता पडेल की नंतर या भीतीने त्यांना झोप येत नसेल. पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली

दूध दरवाढीसाठी भाजपने १ ऑगस्टला आंदोलन करण्याची तयारी सुरु केली आहे. डेअरीना प्रतिलिटर १० रुपये देण्याची भाजपची मागणी आहे. रासप, रयत क्रांती, रिपाइं या संघटनाही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

“आमचं आंदोलन हिंसक नसेल, अधिकाऱ्यांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली तर देवाला दूध अर्पण करणे, असे त्याचे स्वरुप असेल” असे पाटील म्हणाले. आता यावर सरकार काय पाऊल उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कसबा विजयानंतर काँग्रेस राज्य आणि देश जिंकू; परंतु…”, मुख्यमंत्र्यांची सभागृहातून टीका

Aprna

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राम शिंदेंचा पवारांवर निशाणा

News Desk

हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार, अधिवेशनाचा कालावधी लवकरच ठरणार

News Desk