HW News Marathi
महाराष्ट्र

जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही तोपर्यंत मनसेशी युती शक्य नाही!

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र येणार का? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. यावर मनसे आणि भाजप दोन्ही पक्षांना विचारणा करण्यात आली होती. मात्र, दोन्ही पक्षांकडून यावर अद्याप अधिकृतपणे भूमिका मांडण्यात आलेली नव्हती. अखेर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महापालिकेत मनसेसोबत युती करणार का? या दीर्घकाळापासून चघळल्या जात असलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्याचबरोबर युतीसाठी एक अटही घातली आहे. आझ (४ जानेवारी) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते.

“मी वारंवार याबद्दलची भूमिका मांडली आहे. राज ठाकरे असो वा मनसे यांच्याबद्दल आदराने म्हटलेलं आहे. मी एक वाक्य दरवेळी म्हटलं आहे की, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हटलेलं नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्यानं भांडण्याचं कारण नाही. कायदाच आहे. शेवटी तुमचा (मनसे) कशाला विरोध आहे? परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे का? मग देशातल्या सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणं तोही संघर्ष करणं आम्हाला मान्य नाही”.

आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. मी राज ठाकरे यांची स्तुती करता करता, मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,” असं चंद्रकांत पाटील स्पष्ट केलं. “युतीबद्दल अजून तरी विषय आलेला नाही. मी वारंवार तुमच्या माध्यमातूनच मांडतोय. ज्यांचा त्यांच्यासोबत संवाद आहेत, ते लोक चर्चा करतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येणार आणि मनसे-भाजप एकत्र येणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाची वास्तू पाडल्या प्रकरणी सरकारला कोर्टाचा दणका, बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली

News Desk

चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची पुण्यातील 18 एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न!

News Desk

पुण्याकडे आमचं लक्ष आहे, महापालिकेच्या ८० जागा शिवसेना लढवेल – संजय राऊत

News Desk