HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूरवाले मला मध्येच म्यूट का करतायत? मुख्यमंत्र्यांचा मिश्किल सवाल

मुंबई | नागपूर येथील विधानभवनात विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्षाचे आज (४ जानेवारी) उद्घाटन झाले. देशाच्या नकाशावर भौगोलिकदृष्टया नागपूरचे स्थान केंद्रस्थानी आहे. वर्षातील ३ अधिवेशनांपैकी १ अधिवेशन उप राजधानी नागपूरमध्ये घेण्याची महाराष्ट्राची, नागपूर करारानुसार सुरू झालेली परंपरा, संसदीय लोकशाहीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. त्यामुळं नागपुरात आता विधानभवनात वर्षभर गजबजाट असणार आहे. देशात सध्या सर्वच काही माझ्या हाती असं वातावरण असताना आपण राज्यात केंद्रीकरणावर भर देत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. नागपूरकरांशी संवाद साधत असताना ठाकरे यांनी हा टोला लगावला. त्यावेळी मध्येच माईकचा आवाज बंद झाल्याने नागपूरवाले मला म्यूट का करत आहे? असा मिश्किल सवालही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले. सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करत आहे. विधीमंडळ इमारतीचं ऑनलाईनपद्धतीने होणारं उद्घाटनही त्याचाच एक भाग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा नागपूरकरांशी हा संवाद सुरू असताना तांत्रिक कारणामुळे मध्येच माईक बंद झाला. तेव्हा नागपूरवाले मला मध्येच का म्यूट करत आहे, असा मिश्किल सवाल करत मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.

नागपूर राज्याची उपराजधानी आहे याचा मला अभिमान आहे. विदर्भ महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. तुम्ही माझ्या हृदयाजवळ आहात. त्यामुळे तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. कुणी जर अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहू, असंही त्यांनी सांगितलं आहे.

नागपुरात आता कार्यालय सुरू झालं आहे. हे कार्यालय वर्षभर सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती. ती आज पूर्ण झाली याचा मला आनंद आहे, असं सांगतानाच आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई एक झाली आहे, असं ते म्हणाले. नागपूरच्या अधिवेशनातच आपण शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज विधानसभेत OBC आरक्षणाच्या नव्या विधेयकावर होणार चर्चा

Aprna

आम्ही आयुष्यात कधी नव्हे ते राष्ट्रवादीला मतदान केले, आणि तुम्ही…!

News Desk

शरद पवार हे प्रेम करावं असं नेतृत्व आहेच, राऊतांचा राज्यपालांना टोला

News Desk