HW News Marathi
महाराष्ट्र

“वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?”

पिंपरी चिंचवड। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नेहमीचीच आघाडी सरकारवर टीका करत असतात. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर आज दगडफेक व शाई फेकल्या गेल्याची घटना घडली, तर शिवसेना कार्यकर्त्यांनीच हे केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांन केला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?

चंद्रकांत पाटलांनी ट्विट करत हि खंत व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट केलं कि, ““वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली. आता सुरू झालीये हिटलरशाही. भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला, हा त्याचाच पुरावा!” असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलं आहे. तसेच, त्यांनी आपल्या ट्विटसोबत किरीट सोमय्या यांचं देखील ट्विट जोडलं आहे, ज्यांमध्ये गाडीवर शाई फेकली गेलेली दिसत आहे.

सत्तेच्या बळावर केलेले घोटाळे आणि कारनामे लपवण्याच्या उद्देश

सोबतच त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. तसेच, “जनतेची फसवणूक करून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर केलेले घोटाळे आणि कारनामे लपवण्याच्या उद्देशाने, महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सतत आवाज उठवणारे भाजपाचे ज्येष्ठ आणि संघर्षशाली नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध.” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलेलं आहे.

नेमकं काय घडलं?

वाशिममधील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याजवळ ही घटना घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे कालच सोमय्या यांनी ट्विटरवरुन आपण २० ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यासाठी तसेच या प्रकरणाचा पाठपुरवठा करण्यासाठी वाशिमला भेट देणार असल्याचं जाहीर केलं होतं. याच भेटीदरम्यान हल्ला करण्यात आल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भारतीय विद्या भवन’ ने ज्ञानाचा उपयोग समाज निर्मितीसाठी केला! – देवेंद्र फडणवीस

Aprna

आपल्याला शिवसेना प्रमुखांना १०० आमदारांची तोफरुपी सलामी द्यायची आहे !

News Desk

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ६ जणांना अटक आणि जामीनही मंजूर

News Desk