HW News Marathi
महाराष्ट्र

“दरवाढ करणे गरजेचे आहे”, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

पुणे | आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला. याचे स्वागत एकीकडे केले जात आहे तर एकीकडे टीका केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्राच्या या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. पुणे महापालिकेत कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी चंद्रकांत पाटील यांची महापालिका आयुक्त सोबत आज बैठक पार पडली.

यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत आज देशाच्या बजेटमध्ये नव्याने सेस लावण्यात आल्यामुळे पुन्हा पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, दरवाढ करणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी पैसा आणायचा कुठून? असा प्रति प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, वाढत्या इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणार का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी पीक कर्जासाठी ७५ हजार कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सावकारी कर्जापासून त्यांची मुक्तता करून संस्थात्मक कर्ज वाढणार आहे. तसेच स्वामीनाथन आयोगाची ५० टक्के हमीभावाची शिफारस आम्ही पूर्ण करू शकणार असून, आरोग्यासह पायाभूत सुविधांसाठी ४० हजार कोटींची तरतूद केली आहे. हे बजेट शेतकरी, उद्योजकांसह मध्यमवर्गीयांना दिलासा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

…ही निवडणुकांसाठी केलेली गुंतवणूक म्हणता येणार नाही –

आगामी निवडणूक डोळ्यासमोर काही राज्यांना अधिकचा निधी दिला गेला असल्याची टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, काही राज्यांमधील विकास कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. केंद्र सरकार सर्व राज्यांचा सारखाच विचार करते. ज्या राज्यांचा विकासचं झाला नाही त्यातील पाश्चिम बंगालमध्ये आपल्यातील कोणी गेले आहे की नाही माहिती नाही, पण तिथे कशाच कशाला पत्ता नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जास्त पैसे देणे, ही निवडणुकांसाठी केलेली गुंतवणूक म्हणता येणार नाही, असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कुणाला? सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली? एकनाथ शिंदेंचं सविस्तर उत्तर!

News Desk

नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट, प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय अंतिम टप्प्यात ?

News Desk

“रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात”, फडणवीसांच्या “त्या” वक्तव्यावर काँग्रेसची टीका

News Desk