HW News Marathi
महाराष्ट्र

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – चंद्रकांत पाटील

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा रेणू शर्मा या महिलेने दाखल केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, धनंजय मुंडे यांनी बलात्काराचा आरोप फेटाळून लावला. आणि रेणू शर्मा यांच्या मोठ बहिणीशी म्हणजेच करूणा शर्मा यांच्याशी संबंध होते हे स्वीकारणारी पोस्ट केली. यानंतर भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्याबद्दल ताबडतोब राजीनामा द्यावा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता मंत्री पदी राहण्याचा त्यांना हक्क नाही. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करुन राजीनामा घेतील असं वाटत नाही”, अशी पोस्ट चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आता पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे’, संभाजीराजेंचा सरकारला इशारा!

News Desk

1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसासह फिरोजलाही फाशी द्या – सीबीआयची मागणी

News Desk

राज्यात १५ दिवस संचारबंदी लागू, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा निर्णय

News Desk