HW News Marathi
महाराष्ट्र

“शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली”, चंद्रकांत पाटलांचा अनिल परबांना इशारा!

नागपूर | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस अली होती. त्यानुसार 11 वाजेच्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाही. त्यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतलाय. त्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. अनिल परब यांनी ईडी चौकशीसाठी हजर राहायला हवं होतं, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते

सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवं होतं. अनिल देशमुखांचंही असंच चाललं आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. रांगेनं एक-एक मंत्री आहे. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब. मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे. काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला आहे.

परब यांचं ईडीला पत्रं

परब यांनी ईडीला एक पत्र पाठवून आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं आहे. मंत्री असल्यामुळे आजचे कार्यक्रम अगोदरच ठरले आहेत. ते रद्द करता येणार नाहीत. त्यामुळे मला 14 दिवसांचा अवधी देण्यात यावा, असं परब यांनी पत्रात म्हटलं आहे. ईडीनेही परब यांचे पत्र स्वीकारले आहे. आता परब यांना वेळ द्यायचा की त्यांना दुसरे समन्स काढायचे यावर ईडीचे अधिकारी विचार करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अनिल परब यांना तिसरा धक्का

अनिल परब यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण आधी अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना चौकशीसाठी आज हजर राहायचं आहे. त्याशिवाय परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या असल्याचे वृत्त आहे. या धाडीत ईडीच्या हाती काय कागदपत्रे लागली याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. त्यानंतर आता अनिल परब यांना आणखी एक धक्का बसला आहे. परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 2 सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : राष्ट्रवादीची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

News Desk

नांदेड महानगरपालिकेत दोन नगरसेवकांत तुंबळ हाणामारी

News Desk

शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जातोय म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव पुढे केले – नितेश राणे

News Desk