HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांमध्ये ताकद असती तर ८० तासांचं सरकार आणि आमदार टिकवता आले असते!

अहमदनगर | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. चंद्रकांत पाटील साईबाबाच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी टोला लगावला आहे.

अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर ८० तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते. त्यांच्या आमदारांना त्यांनी सांभाळलं असतं तर सरकार टिकले असते”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

“भाजपमधले काही आमदार नाराज आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यावर तुमचं आघाडी सरकार उत्तम चाललंय, आमच्या लोकांना कशाला आकर्षित करता?, असं पाटील म्हणाले. अजितदादा खूप ‌चांगले नेते आहेत. चांगलं काम करतात. गंमत निर्माण होईल अस बोललं तर त्यांची प्रतिष्ठा कमी होईल”, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

“भाजपचे आमदार नाराज असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तसंच राष्ट्रवादीत लवकरच मोठी महाभरती होणार असल्याचा दावा ते करत आहेत. यावर तुम्ही सरकार चालवा आम्ही विरोधी पक्ष सांभाळू”, असं पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांच्यावरती पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, “कोण संजय राऊत?”, अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांनी दिलेल्या घटनेतील चौकटींना मानायचे नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरु आहे आणि पुढेही सुरु राहील. हे सर्व तुम्हांला मान्य नाही का?”, असा सवाल त्यांनी संजय राऊत तसंच शिवसेनेला केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढले तर त्यांची ताकद जास्तच होणार. पण आम्हीही ग्रामपंचायत निवडणूका ताकदीने लढवणार. एक मात्र खरं निवडणूक असो वा निर्णय शिवसेना आपलं नुकसान करुन घेत आहे हे मात्र तितकंच खरं”, असेही पाटील म्हणाले आहेत.

म”ला चंपा बोललं जात मात्र आम्ही त्यास‌ उत्तर देत नाही. मुख्यमंत्र्यांना उठा आणि शरद पवार यांना शपा असं म्हटलेलं चालेल का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

निवडणूक संपल्यावर पाच वर्ष एकत्र काम करावं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र गेल्या वर्षात सरकार वाचवण्यासाठी विरोधकांना टार्गेट केलं जातंय. अशा पद्धतीने राग मनात धरुन सरकार चालत नाही”, असं पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अजित पवारांचं थेट नाव घेत नाही पण…”, चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

News Desk

“एका महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणं हा पुरुषार्थ आहे का?”, जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना सवाल 

swarit

राज्यात २० एप्रिलपासून सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार निवडक उद्योग सुरु होणार

News Desk