HW News Marathi
महाराष्ट्र

जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकायला हवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई | जानेवारी २०२१ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना तयार असल्याचे दिसून येत आहे.जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकायलाच हवा. यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.

समाजोपयोगी कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंका. संपर्पमंत्री, पालकमंत्री यांच्याशी समन्वय वाढवा. एकजुटीने या निवडणुकीना सामोरे जा, असं उद्धव ठाकरे यांनी काल (१७ डिसेंबर) म्हटलं आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही योजनासक्षमपणे राबविण्यासाठी सरकारी यंत्रणेसोबत काम करा. राज्यातील रुग्णांचा आकडा कमी होत आहे. त्यामुळे कोरोना हद्दपार झाल्याशिवाय शांत बसू नका, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दरम्यान, काल वर्षा’ निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीबाबत शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१० दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि…”,जळगावच्या विजयाचा खडसेंनी सांगितला फॉर्म्युला⁩

News Desk

मोर्चाहून परतणाऱ्या सहा मराठ्यांवर काळाची झडप

News Desk

भाजप नेते ST कर्मचाऱ्यांना भडकवतायत!;, राऊतांचा आरोप

News Desk