HW News Marathi
महाराष्ट्र

कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारच, चंद्रकांत पाटलांचा टोला

कोल्हापूर | निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या आधी त्यांनी काही वेळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यामुळे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. 2024 मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे. चंद्रकांत पाटील आज (14 जुलै) कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना दोन्ही काँग्रेसवर टीका केली. 2024मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारचे नाटक चालू आहे

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. एकाने मारायचं आणि दुसऱ्यानं समजवायचं असा खेळ सध्या राज्य सरकारमध्ये सुरू आहे. हा खेळ न कळण्या इतपत महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. त्याची शिक्षा या सरकारला निवडणुकीत मिळेलच. सरकारचे नाटक चालू आहे. त्याला लोकं विटली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहेच

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एखादी गोष्ट घडली ती आवडली नाहीतर भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घेतलं जावं हे त्यांना वाटत होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. त्यांनी पद्म पुरस्कार देतानाही शोधून शोधून पदं दिलं, लोकांच्या ध्यानीमनीही नव्हतं अशा लोकांनाही पदं दिलं. राजकारणताही सेम आहे. संघटनात्मक जबाबदारी असो की मंत्रिपदं देणं असो त्यांनी लोकांना शोधून शोधून पदं दिलं. पक्षात समतोल साधण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो, असं पाटील यांनी सांगितलं आहे.

न्याय मिळताना कुणावर तरी अन्याय होतोच

न्याय म्हणजे कोणावर तरी अन्याय होतोच. न्याय सर्वांनाच एकावेळी मिळू शकत नाही. भागवत कराडांना मंत्रिपद मिळालं तर प्रीतम यांना नाही मिळालं. राणेंना मिळालं तर रणजीत निंबाळकरांना नाही मिळालं. केंद्रीय मंत्रिमंडळात 28 जणांना जोडायचं होतं. त्यानंतर 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे 40 जणांना जोडायचं होतं. देश मोठा आहे. त्यात न्याय मिळतानाच कुणावर तरी अन्याय होतो. त्यात नेता नव्हे कार्यकर्त्याने रिअॅक्ट होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यात काही चुकीचं नाही. पण लगेच सावरणं हे सुद्धा समजदारीचं लक्षण आहे. ते काल पंकजा यांनी केलं. कुणी राजीनामे द्यायचे नाही. हे आपलं घर आहे. आपल्या घरातून का निघायचं बाहेर, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्यावर इतके दुखाचे डोंगर कोसळलेले आहेत. तरीही या वयात त्यांनी मॅच्युरीचं टोक दाखवलं आणि सांभाळलं, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, फडणवीसांचा आरोप

swarit

धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही’ उद्धव ठाकरेंचा इशारा!

News Desk

संजय राठोडांवर शरद पवार नाराज? पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk