HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्हाला जनतेला शॉक द्यायची सवय आहे मात्र, जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल – चंद्रकांत पाटील 

मुंबई | राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत तुम्हाला जनतेला ‘शॉक ‘ द्यायची तुम्हाला सवय आहे, मात्र जनता लवकरच तुम्हाला ‘शॉक’ देईल. जनता सर्वकाही बघतेय हे लक्षात ठेवा’ अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे. यासंबंधी चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर एक ट्वीट केले असून त्यातून सरकारवर टीका केली आहे.

 

गेल्या काही दिवसांत वीज बिल वाढलं असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. पण वीज बिलात वाढ झाली नाही असं भाष्य नितीन राऊत यांनी केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटरद्वारे उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ‘एक बातमी वाचली की राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणत आहेत ” वीज बिलं वाढलेली नाही , लोकांचा तसा समज झाला आहे.” हे वाचून महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत वाईट वाटले. हे जोडून तोडून तयार झालेले तिघाडी सरकार संपूर्णपणे नागरिकांप्रती असलेली आपली जबाबदारी विसरली आहे. ‘

 

‘मंत्री मोहोदय, मी आपल्याला परत सांगू इच्छितो की ग्राहकांना ‘शॉक’ देणं बंद करा. जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेस आणि राहुल गांधींना जो शॉक दिला आहे तो विसरू नका. येत्या काळात तो तुम्हाला परत महाराष्ट्रात नक्कीच अनुभवायला मिळेल. जनता सर्वकाही बघते हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र हा फॉर्म्युला पाच वर्षांपासून सुपरहिट !

News Desk

नाशिकमध्ये सैन्य भरती ६३ जागांसाठी २० हजारहून अधिक तरुण

News Desk

“राज्यात सध्या कोणतेही निर्बंध आणि लॉकडाऊन नाही”, राजेश टोपे

News Desk