HW News Marathi
महाराष्ट्र

‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान’ – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. संभाजीराजे यांनी चालढकल केली तर भाजप जो कोणी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुढाकार घेईल, त्याच्या पाठिशी उभा राहील, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

ते आज (११ जून) कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना संभाजीराजे राज्य सरकारला वेळ देत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मराठा मोर्चा काढण्यात चालढकल झाली तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कोणाकडे जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. मात्र, वेळ निघून गेल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी तर मिळणार नाही ना, याचा विचार संभाजीराजे यांनी केला पाहिजे.

संभाजीराजे एकदा मोर्चा काढणार, एकदा लाँग मार्च काढणार असे सांगतात. कोल्हापुरातही 16 जूनला मराठा मोर्चा निघणार का, याची अद्याप शाश्वती नाही. तुम्ही या सर्व गोष्टी मराठा समाजासमोर नीटपणे मांडल्या पाहिजेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

संभाजीराजे यांनी रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मी त्यांना पाठिंबा जाहीर केला. आता त्यांनी माघार घेतली तरी भाजपच्या भूमिकेत फरक पडणार नाही. पण उद्या कोल्हापुरात दुसऱ्या कोणी पुढाकार घेऊन मोर्चा काढला तर भाजप त्यांनाही पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

‘पायी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी मिळालीच पाहिजे’

महाविकासआघाडी सरकार धार्मिक गोष्टींना विरोध करते बाकी सगळ्याला परवानगी देते. शरद पवार यांनाही आजारपणाच्या काळात हॉटेल मालकांची काळजी होती. मात्र, आषाढीच्या पायी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली.

मराठा आरक्षण | समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला, संभाजीराजेंचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या १६ जूनला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे संभाजीराजे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी नाशिकच्या पत्रकारपरिषदेत मराठा लोकप्रतिनिधींना इशारा दिला होता. मराठा आरक्षणासंदर्भात मी भूमिका मांडल्यानंतर राठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. त्यामुळे आता संभाजीराजे यांच्या फेसबुक पोस्टमुळे मराठा लोकप्रतिनिधींवरील दबाव वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

News Desk

शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही, नारायण राणेंचा गंभीर आरोप

News Desk

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या ट्विटवर माणिकराव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया 

News Desk