मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर सातत्याने टीकेची झोड उठवणारे शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी सरकारमधला विसंवाद आणि वादावर बोट ठेवत पाटील यांनी राऊतांना टोला लगावला आहे. पोलीस आयुक्तांच्या बदल्यांवरून झालेलं नाराजीनाट्य, पारनेर नगरसेवकांची फोडाफोडी आणि घरवापसी, शेतकरी कर्जमाफी आणि बोगस बियाणांचा पुरवठा असे विषय चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ सदरासाठी संजय राऊत यांना सुचवले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी मांडलेले प्रस्ताव –
नंबर १ – “मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय १० आयपीएस अधिकाऱ्यांची बदली… ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे… तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द… मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं….हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…”
नंबर २ – “पारनेर नगरपरिषदेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला… सर्वांना आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा होतच असते… पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत… मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही… हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…”
नंबर ३- “ठाकरे सरकार तर सर्वोत्तम आहे… यापूर्वी राज्याला असे प्रशासन कधीही लाभले नाही…. मात्र कोरोनाचा मृत्युदर वाढत चालला आहे… दिवसाला ६ हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत… हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…”
नंबर ४ – “राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्याचे ढोल बडवले… अजूनही अंमलबजावणी नाही… शेतकऱ्यांना वाईट दर्जाचे बियाणे दिले जात आहेत… खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यात आलं नाही… हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…”
गेल्या वेळी ‘रोखठोक’ सदरात संजय राऊतांनी राज्यपाल नियुक्ती सदस्यांच्या नियुक्त्या लांबणीवर पडण्याच्या शक्यतेचा आधार घेत राज्यात राजकीय आणीबाणी सुरु असल्याची टीका केली.
नंबर १ – "मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय १० आयपीएस अधिकाऱ्यांची बदली…… ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे…….तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द…….
मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं….हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…."
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 8, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.