HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

तर मग आम्ही उद्धव ठाकरेंना उठा आणि शरद पवारांना काय शपा म्हणायचं? चंद्रकांत पाटील

पुणे | “जयंत पाटील म्हणतात की, चंपा म्हटलं म्हणून काय झालं, तर मग आम्ही उद्धव ठाकरेंना उठा म्हणावं काय”, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. जयंत पाटील यांना जपा, शरद पवारांना काय शपा म्हणायचं आणि पुढचं मी काय म्हणत नाही ते म्हणणं योग्य नाही, पुढे चहा पित असताना म्हणू, ही संस्कृती जोपासायची आहे काय, असा उपरोधिक टोलाही चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. चंपा आणि टरबुज्या म्हणायचं हे जे कल्चर सुरू आहे ते बदललं पाहिजे, नाही तर आम्हाला पण म्हणता येत, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला. देवेंद्र फडणवीसांनी वाढीव वीजबिल भरलं म्हणून त्यांनी वीजबिल भरण्याचं समर्थन केले असं म्हणणं हास्यास्पद आहे. वीजबिलात सवलत देणार ही घोषणा नितीन राऊत यांची आहे, त्यांनी ती पूर्ण करावी, असं आवाहनही चंद्रकात पाटलांनी ऊर्जामंत्र्यांना केलं आहे.

Related posts

काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांसाठी वाढवावी | शहा

News Desk

मोदी सरकारला मोठा धक्का ! कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची अंतरीम स्थगिती

News Desk

नागालँडमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी पाडला पैशाचा पाऊस

News Desk