HW News Marathi
महाराष्ट्र

यांच्या बापाची पेंड आहे का? चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांवर निशाणा

पुणे | “बाजार समित्यांना सेस गोळा करता येणार नाही, अशी तरतूद केंद्र सरकारने नवीन कृषी कायद्यात केली आहे. मात्र, बारामती बाजार समितीने पत्रक काढून सेस गोळा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अरे सेस काय तुमच्या बापाची पेंड आहे. सेसचा मलिदा खायदा मिळणार नसल्याने विरोधकांची तडफड चालू आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीसाठी शेकडो ट्रॅक्टरची रांग पुणे-सोलापूर महामार्गावरती भाजपने लावली होती. वरवंडहून निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप चौफुला या ठिकाणी झाला आणि तिथं या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये झालं. सभेत भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने कृषी विधेयकांच्या अंमलबजावणीला दिलेल्या स्थगिती बद्दल राज्य सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांकडून फक्त सेस गोळा करण्यासाठी या विधेयकाला विरोध होत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

भाजप या स्थगितीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असून ही स्थगिती उठवली जाईल, असा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र ते यावरच थांबले नाहीत तर राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल असं जाहीर केलं. यांच्या बापाची पेंड आहे का असं.. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आणि पवारांना उद्देशून पुन्हा एकदा बापाचा उल्लेख केला.

शनिवारी पुण्यातच भाजप पदाधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून आम्ही तुमचे बाप आहोत असं म्हटलं होतं. पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीवरून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या बापाचा उल्लेख केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांकडून अटक

Aprna

राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो,तलवार कुणा विरोधात उपसणार? विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना प्रश्न

News Desk

मनसेची वेळ केव्हाच निघुन गेली !

News Desk