HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या काळात फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल!

पुणे | राज्यात कोरोनाचे संकट ओढवले आहे. अशात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत मातोश्रीवर असतात अशी टिका कायम भाजपच्या नेत्यांनी केली आहे. यावरूनच पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला सुनावले आहे.

कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. आम्ही कोरोनाच्या काळात सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आज (१५ मे) पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे म्हटले आहे.

ग्लोबल टेंडर हा शब्द उच्चारलाच कसा?

यावेळी त्यांनी लसीकरणाचे ग्लोबल टेंडर, मराठा आरक्षण आणि राज्यातील कोरोना परिस्थिती अशा विविध विषयांवर भाष्य केले. केंद्र सरकारने परदेशी लसींना अद्याप परवानगी न दिल्याने महाराष्ट्र सरकारची लस खरेदी रखडल्याचे अजित पवार म्हणतात. पण मग मुळात लसींना परवानगी नसताना त्यांनी ग्लोबल टेंडर हा शब्द उच्चारलाच कसा?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पुणे पालिकेला ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून लस खरेदीसाठी परवानगी दिली जात नसल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपात तथ्य असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

‘उद्धव ठाकरेंनी आधीच पीपीई किट घालून बाहेर पडायला हवं होतं’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे इतक्या प्रो-अ‍ॅक्टिवली घराबाहेर पडले, हे कौतुकास्पद आहे. खरंतर त्यांनी यापूर्वीच पीपीई किट घालून बाहेर पडायला हवं होतं, अशी खोचक टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात ३३२० नवे कोरोना रुग्ण, देशाचा आकडा ५९६६२ वर

News Desk

आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो, नाहीतर…! प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा

News Desk

सगळ्यांसाठी समान नियम ठेवा, परदेशी कंपन्यांच्या लसींसाठी नियम शिथिल केल्यानंतर सिरमची केंद्राकडे मागणी

News Desk