HW News Marathi
महाराष्ट्र

“बेळगाव झांकी आहे, पण मुंबई अभी बाकी है”, चंद्रकांत पाटलांचा सेनेला टोला!

पुणे | बेळगाव महानगरपालिका निवडणूक पार पडल्या आहेत. यात भाजप विजयी झाला आहे. यावरून आता राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘ज्या ज्या वेळेला रिझल्ट चांगले असतात, त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो. हे त्यांच्या आणि विरोधकांच्या स्वभावानुसारच आहे’, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

पण मुंबई बाकी आहे

सोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केलं जात आहे की बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, याबाबत पाटील यांना विचारलं असता, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलं होतं. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. तेव्हा आम्ही म्हणलं की ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार, असं थेट आव्हानच पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे. तसंच बेळगावात भाजपचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यात निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचं पाटील यांनी आवर्जुन सांगितलं आहे.

खोटं बोल पण रेटून बोल..

संजय राऊत यांच्यावर देखील चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल.. सकाळी एक बोलायचं दुपारी एक. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचं दिसतंय. त्यामुळे दुपारी लक्षातच राहत नाही काय बोललो. ते क्लिअर कट अस म्हणाले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळाच काढतो. ते पोलीस बघतली. पण पोलीस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते काय करतील माहिती नाही. पण आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर तक्रार दाखल केली आहे’, असं पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसणं वाढवलं पाहिजे

बेळगाव सीमा वादाबाबत पत्रकारांनी विचारलं असता, वर्षानुवर्षे आमचा मुद्दा हा आहे की दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसणं वाढवलं पाहिजे. हा सगळा न्यायालयीन विषय आहे तो कधी सुटेल तेव्हा सुटेल. तोपर्यंत तिथल्या मराठी भाषिकांना सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाची एकच भूमिका आहे की, हा सगळा मराठी भाषिक भाग आहे आणि तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSCExam : विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मनसेचा सवाल

News Desk

#SushantSinghRajput : मुंबई पोलिसांचा तपास CBI कडे जाणार का, आज होणार सुनावणी

News Desk

प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा! – ॲड.यशाेमती ठाकूर

Aprna