HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांनी झोप कमी करावी आणि झेपत नसेल तर… चंद्रकांत पाटलांचा खरमरीत टोला!

पुणे | गेल्या काही दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक वार सुरुच आहेत. आताही चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर खरमरीत टीका केली आहे. अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी टीकाचंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोरोनाच्या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील कोरोना स्थितीवर पाटील पुण्यात बोलत होते.

यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या संभाव्य लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला. यावेळी त्यांनी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत.

अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं. पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदला, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे आता अजित पवार आपल्या अंदाजात या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक लढाया रंगताना दिसत आहेत. अजित पवार यांनी पंढरपूरच्या सभेत ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले होते.

यावर, चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. अजित पवार यांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, अन्यथा मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉटफॉर्म करेन, असा इशारा दिला आहे. अजित पवारांनामला एक इशारा द्यायचा आहे.

खूप दिवस मला ‘चंपा’ म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत, त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील, असे ते म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांचा पलटवार!

News Desk

पंढरपूरचा पांडूरंग भाजपला पावला ! भगिरथ भालकेंचा धुव्वा उडवत समाधान अवताडे विजयी

News Desk

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, शरद पवारांनी केलं सेनेचं कौतुक

News Desk