HW News Marathi
महाराष्ट्र

चेंबुर बलात्कार प्रकरण; आरोपीकडून सत्र न्यायालयात धाव

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातून महिला अत्याचाराच्या अनेक गंभीर घटना समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये घडला होता. ९ मार्चला एका २६ वर्षी युवतीने तिच्यावर सलग १ वर्ष वारंवार बलात्कार केला गेला असल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा अनेक तक्रारीनंतर तब्बल ५ महिन्यांनी नोंदवून घेण्यात आला होता. या गुन्ह्याची FIR कॉपी ही HW मराठीच्या हाती आली होती. तसेच HW मराठीने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर संबंधित तरुणीच्या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली.

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत असं म्हंटलं आहे की ऑक्टोबर २०२० पासून मोनिश पाटील नावाचा तरुण तिला मारहाण करायचा. तसेच तिला खोलीत डांबुन ठेवायचा. या दरम्यान त्याने वारंवार जबरदस्तीने पीडितेशी शरीर संबंध ठेवले. तर या संदर्भात जर पीडितेने पोलीसात तक्रार केली तर तिच्यावर ऍसिड टाकुन तिला जिवे मारण्याची धमकी देखील आरोपीने तिला दिली, असा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे. मात्र, तरी देखील पीडितेने पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, असेही तिने सांगितले. पण धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी ५ महिने उलटून गेले तरी सुद्धा FIR नोंदवून घेतला नव्हता. मात्र, जेव्हा HW ला या बद्दलची माहिती मिळाली तेव्हा HW ने हा मुद्दा उचलून धरला आणि त्यामुळे पोलिसांना पीडितेची तक्रार नोंदवून घेण्यास भाग पडलं.

दरम्यान, आरोपीविरुद्ध या प्रकरणात IPC कलम ३७६, ३७६(२), ३४२, ५०४, आणि ५०६(२) च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. पण, गुन्हा नोंदवून आज १७ दिवस उलटून गेले असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपी फरार असून लवकरच आरोपीला पकडू असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्याचबरोबर आरोपीविरुद्ध मुंबईत अनेक पोलीस स्टेशनमध्ये ड्रग्स आणि मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील HW च्या हाती आली आहे. दरम्यान, अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी आरोपीने आता सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अटककपूर्व जमीन अर्जाची याचिका आरोपीच्या  वतीने अॅड. राजन साळुंखे यांच्याकडून दाखल करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाच्या कोर्ट क्र. ४१ मध्ये या याचिकेवर सुनावणी होणार आहे. काल (२५ मार्च) आरोपीला न्यायालयात हजार राहण्यास सांगण्यात आले होते. पोलीस या प्रकरणी तपास करत असून आता या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असेल. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मला परकीयांनी पराजीत केले नाही तर स्वकीयांनीच केलं’ आशा बुचकेचं विधान!

News Desk

चक्क विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा…..

Ruchita Chowdhary

खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत सचिवस्तरावर समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

News Desk