HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई | राज्यातील ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून १ ते १५ एप्रिलपर्यंत या पंधरा दिवसात राज्यातील १ कोटी ३५ लाख ५४ हजार ४४१ शिधापत्रिका धारकांना तब्बल ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे १८ लाख ५१ हजार ४३ क्विंटल गहू, १४ लाख २८ हजार ५४५ क्विंटल तांदूळ तर १७ हजार १२१ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ६ लाख ६८ हजार ६२२ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. ३ एप्रिलपासून पात्र रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वितरित करण्यात येत असून १० लाख ८० हजार २१० क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी ३५ लाख ८२० क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिलसोबतच मे आणि जूनमध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तो आवाज माझ्या मुलाचा नाही!”,अरूण राठोडच्या आईचा खुलासा…

News Desk

मुंबई शेअर बाजारातही मराठी टक्का वाढतोय – सुभाष देसाई

Aprna

ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna