HW News Marathi
महाराष्ट्र

“इम्पेरिकल डेटा केंद्रानेच दिला पाहीजे”, छगन भुजबळांची माहिती

मुंबई | महाराष्ट्रमध्ये सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज(३ सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या संदर्भात गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वांची मते जाणून घेतली. त्यावेळी ओबीसींच्या आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, अशी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मागणी केली. आज पुन्हा एकदा विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मागणी धरून ठेवली. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने दिला तर प्रश्नच सुटेल, असं सांगितलं आहे.

सर्व पक्ष एकत्र प्रयत्न करत आहोत

छगन भुजबळ यांनी या बैठकी नंतर सांगितलं, “ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचलं पाहीजे यासाठी आम्ही सर्व पक्ष एकत्र प्रयत्न करत आहोत. यासाठी आज दुसरी बैठक घेतली. भारत सरकारकडे इम्पेरिकल डेटा आहे तो जर मिळाला तर प्रश्नच मिटतो. महाराष्ट्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टाकडे २३ सप्टेंबरपर्यंतचा वेळ मागितला आहे. ते सरकारच्या बाजून उभे राहतील आणि सांगतील हा डेटा केंद्र सरकारला राज्याला द्यायला सांगा. दुसरं सॅम्पल डेटा ताबडतोब तरी आपल्याला तयार करता येईल का?, दोन चार महिन्यात पूर्ण करता येईल का यावर चर्चा केली गेली. जर हा डेटा गोळा करताना वेळ लागला तर निवडणुकी पुढे ढकल्यावा लागतील.” असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

सिद्ध करण्याची न्यायालयाने अट घातली

आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींचे राजकीय मागसलेपण सिद्ध करण्याची न्यायालयाने अट घातली आहे. त्याची पूर्तता राज्य सरकारला करावी लागणार आहे.परंतु त्यासाठी नेमका किती कालावधी लागणार आहे, याबाबत अनिश्चितता आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभीच फेब्रुवारी-मार्चमध्ये मुंबईसह १० महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर वर्षभरात आणखी आठ महानगरपालिकांची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणुका घ्याव्या लागतील.

त्याशिवाय गेल्या वर्षी करोनामुळे व काही न्यायालयीन प्रकरणांमुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद व कोल्हापूर या महापालिकांच्या निवडणुकाही व्हायच्या आहेत. त्याचबरोबर २५ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री, १३ मंत्रिपदांची ऑफर ?

News Desk

‘बजरंग पुनियाचा धमाकेदार विजय’, कुस्तीत कांस्यपदक!

News Desk

‘खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’, आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

News Desk