मुंबई | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेले अनेक दिवस रंगत होत्या. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ शिवसेनेत येणार नाहीत”, असे स्पष्ट विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे हे नाशिक, दिंडोरी येथील कार्यकर्त्यांशी बोलत होते. दरम्यान, छगन भुजबळ यांनी देखील यापूर्वी त्यांच्या पक्षप्रवेशाच्या सर्व चर्चा म्हणजे फक्त अफवा असल्याचे म्हटले होते.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादीतून सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, यापूर्वी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशादरम्यान देखील उद्धव ठाकरे यांना छगन भुजबळ यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी “आताचे आधी पाहू, नंतरचे नंतर बघू”, असे म्हणत याबाबत फारसे बोलण्यास नकार दिला होता. मात्र, आता कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.