HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्र्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी ‘यांना’ केली विनंती

मुंबई । संपूर्ण मुंबई शहर आणि महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. मुंबई, ठाणेसह पालघर परिसरात होणारी अतिवृष्टीची परिस्थिती पाहता सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे (एनडीआरएफ) अजून सहा तुकड्या पाठविण्याची विनंती केली आहे. मुसळधार पावसामुळे
होत असलेल्या अतिवृष्टीमुळे लष्कर, नौदल आणि अन्य यंत्रणांच्या संपर्कात असून प्रशासनाने त्यांना सतर्क राहण्याच्या इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

राज्यभरात होत असलेली अतिवुष्टीची परिस्थितीची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन परिस्थितीतील यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पुरात अडकलेल्या खडवली नजिकच्या नांदखुरी येथील सुमारे ३५ ग्रामस्थांची हेलीकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करावी अशी विनंती भारतीय हवाई दलाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून ठाणे शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना देखील ठिकठिकाणी सुरू असलेल्या मदत कार्याचे समन्वय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर मुंबई महापालिका आणि आपत्कालिन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून देखरेख करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related posts

…म्हणून मी स्वत: मुख्यमंत्र्यांचे थकलेले पाणी बिल भरणार !

News Desk

मुख्यमंत्री संपूर्ण ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढणार

News Desk

ममता बॅनर्जी झाशीची राणी नाही तर पुतना मावशी !

News Desk