HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे यांचा जबाब पोलिस 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार!

नाशिक। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद चांगलाच पेटला होता त्यानंतर राणे यांना अटक झाली जामीनही झाला. आता यात 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राणे यांचा जबाब नाशिक पोलिस येत्या 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे.

25 सप्टेंबर रोजी राणे यांचा ऑनलाइन जबाब

राणे यांनी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी नाशिक पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. राणे यांच्याविरोधात शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राणे यांना अटक झाली. त्यांना महाड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आले होते. राणे यांना दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर पर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश राज्य सरकारला दिले होते. यापूर्वी गणेशोत्सव असल्यामुळे 2 सप्टेंबर रोजी उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र राणे यांच्या वकिलांनी नाशिक पोलिसांना पाठविले होते. नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वकिलांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी, 25 सप्टेंबर रोजी राणे यांचा ऑनलाइन जबाब नोंदविला जाणार असल्याची माहिती दिली.

युवासेना आक्रमक झाली होती

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेना आणि युवासेना आक्रमक झाली होती. त्यांच्या वक्त्वव्याचा निषेध करत राज्यभर आंदोलने करण्यात आली. या प्रकरणावर नारायण राणे यांनी जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेत सविस्तर म्हणणे मांडले. येत्या काळात शिवसेनेची प्रकरणे चव्हाट्यावर आणू, असा इशारा दिला होता. मात्र, तूर्तास तरी हे प्रकरण शांत झाले आहे. आगामी काळात राज्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यावेळी पुन्हा एकदा राजकीय खडाजंगी पाहायला मिळू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून इशारा

News Desk

“ येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका”, नितेश राणेंचा खोचक सल्ला

News Desk

‘…आता ठिणगी पडली, आमच्या नादाला लागू नका’ संजय राऊतांचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा

News Desk