HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांना प्रत्येक नागपूर कर गुंड वाटू लागले !

अहमदनगर | “आज नागपूर क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते, “असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१० ऑक्टोबर) नागपूरच्या प्रचार सभेत केले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले की,” प्रत्येक नागपूर कर गुंड वाटू लागले असून एका मासामान्य नागपूरकारांनीच त्यांची अशी अवस्था करुन ठेवली, असे म्हणत पवारांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री आज (११ ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगावातील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

शरद पवार यांनी काल (१० ऑक्टोबर) नागपूरमध्ये प्रचार सभा घेतली होती. त्यावेळी पवार म्हणाले की, “नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर पूर्वी त्याच्या वैभवासाठी ओळखले जायचे. आज नागपूर क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते. या नागपूरचे प्रतिनिधित्व फडणवीस करतात. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्रीही तेच आहेत. जर तिथे कायदा-सुव्यवस्था नसेल तर ही तुमची आमची बदनामी आहे.” असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्यावर टीका करण्याबरोबरच भाजपने पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच महायुतीला विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुख पुन्हा अडचणीत येणार? जयश्री पाटील उतरल्या मैदानात!

News Desk

राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची अडचण वाटत असेल म्हणून…राज्यपालांच्या सल्ल्यावर शिवसेनेचे उत्तर

News Desk

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार

Aprna