पुणे । पुण्यात बुधवारी (२५ सप्टेंबर) झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त केला आहे. पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या पावसात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे, या भागांत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी देखील झाली आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे तर अनेकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्या पुरात वाहून गेल्या आहेत.
2 NDRF teams are deployed in Pune & 2 in Baramati.
One more NDRF team is on way to Baramati.
State Government is also closely monitoring the dam discharge.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 26, 2019
“राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नियंत्रण कक्ष सातत्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका यांच्या संपर्कात आहे. पुण्यामध्ये आणि बारामतीमध्ये एनडीआरएफच्या २ टीम दाखल झाल्या असून बारामतीमध्ये अजून एक टीम दाखल होणार आहे. या भागातील धरणांच्या विसर्गावरही राज्य सरकार लक्ष ठेवून आहे”, असे माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून दिली आहे.
“राज्य सरकार आणि पुणे जिल्हा प्रशासन, महापालिका पूरग्रस्त भागातील लोकांना सर्वतोपरी मदत करेल”, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे, पुण्यात झालेल्या या जीवितहानी आणि वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर दुःख व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या पूरपरिस्थिती मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.