HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री घेणार शहाची भेट

नवी दिल्ली । राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आणि शिवसेना-भाजप यांच्यातील संघर्ष मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (४ नोव्हेंबर) दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट होणार आहे. मुख्यमंत्री आज सकाळी ११ वाजता शहांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफ निधीतून जास्तीतजास्त आणि तातडीची मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री अमित शाहाची भेट घेणार आहे. या बैठकीत राज्यातील राजकीय सद्यस्थितीवरही चर्चा वर्तवली जात आहे. त्यामुळे आजच्या मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या बैठकीत राज्याच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभेचा निकाल लागून आज ११ दिवस उलटले असून देखील राज्यातील सरकार स्थापन झाले नाही. तर सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समान वाटपावरून घमासान सुरू आहे. तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गेले. तसेच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी दादरमधील शिवतीर्थावर होईल. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहे. यावेळी ते भाजपवर निशाणा साधत आहे. तसेच संजय राऊत हे सत्त स्थापनेसाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वत:ला वाघ समजतात”, राऊतांच्या ‘त्या’ विधानावर निलेश राणेंचा 

News Desk

मला कोअर कमिटीतून बाहेर काढले !

News Desk

भाजपचे नेते भाडखाऊ-उद्धव ठाकरे यांची टीका

News Desk