मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (गुरुवारी) दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी हे देखील आज दुपारी ३ च्या सुमारास दिल्लीला रवाना होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि इतर सर्व राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी १५ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर रुग्णालयाकडून वाजपेयींच्या प्रकृतीची माहिती देणारे मेडीकल बुलेटीन जारी करण्यात येत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील रुग्णालयात जाऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
Delhi: Delhi CM Arvind Kejriwal and Deputy CM Manish Sisodia arrive at All India Institute of Medical Sciences where former Prime Minister #AtalBihariVaajpayee is admitted. pic.twitter.com/7clp2dTuqI
— ANI (@ANI) August 16, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.