HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला… शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ !

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. पण, त्यापैकी काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. २००८ मध्ये राज्यात कर्जमाफी योजनेतील लाभापासून वंचित राहिलेल्या अशा २००१ ते २००९ पर्यंतच्या थकीत असलेल्या शेतकरी खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

२००१६ ते २०१७ मधील जे थकीत खातेदार आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवदेन दिले आहे. फडणवीस म्हणाले, ‘शेतकरी, कष्टकरी व आदिवासींच्या संघटनांनी शासनाला सोमवारी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मागण्यांबाबत मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली.’

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील ठळक मुद्दे

  • 2001 ते 2009 मधील थकित खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय.
  • मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना येथे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी 396 कोटींचा खर्च आणि आवश्यक पदांस मान्यता.
  • बृहन्मुंबईतील शासकीय जमिनींवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासंबंधीच्या धोरणात सुधारणा करण्यास मान्यता.
  • भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित-विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याचा निर्णय.
  • कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळावर निवडणुकीसाठी व्यापारी व अडते या घटकातील मतदार होण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम-1963 मध्ये सुधारणा.
  • राज्य कामगार विमा योजनेसाठी राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय.
  • यवतमाळ जिल्ह्यातील देवधर (ता. राळेगाव) येथील बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणीची शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड.
  • वन विभागातील योजना-योजनेत्तर फंडातून वेतन घेणाऱ्या आणि नियमित करण्यास पात्र असणाऱ्या उर्वरित 569 कामगारांना कायम करण्याचा निर्णय.
  • भूमिगत नळमार्ग टाकणे आणि भूमिगत वाहिन्या बांधण्यासाठी जमिनीमधील वापर हक्काचे संपादन करण्यासह त्यांच्याशी संबंधित इतर बाबींसाठी तरतूद करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा वाढवण्याचं धोरण”, सचिन पायलटनी लावला सरकारला बोल

News Desk

गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने बालकाचा मृत्यू

News Desk

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री

News Desk