HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर ठाकरे सरकारचे खातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे सर्वात जास्त खाती

मुंबई | महाविकासआघाडीचे बहुप्रतीक्षित अशा खातेवाटपाची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. अखेर आज (१२ डिसेंबर) महाविकासआघाडीचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या सहा मंत्र्यांमध्ये खाते वापट करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंख्यंसबोत शपथ घेतली होती.

शिवसेनेच्या वाटेला मुख्यमंत्री, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम खाती आली आहेत. राष्ट्रवादीकडे अर्थ, गृहनिर्माण,राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा ही खाती आले आहेत. तर काँग्रेसकडे महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण, ही खाती आली आहे.

जाणून घ्या या सहा मंत्र्यांना दिली ‘ही’ खाते

  • एकनाथ शिंदे (१०) – गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
  • सुभाष देसाई (१२) – उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.
  • छगन भुजबळ (०६) – ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
  • जयंत पाटील (०७) – वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास,
  • बाळासाहेब थोरात (०६) – महसूल, ऊर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
  • नितीन राऊत (०८) – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त, जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

१६ ते २१ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन

येत्या आठवड्यात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे सोमवार (१६ डिसेंबर) ते शनिवार (२१ डिसेंबर) असे पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन असणार आहे. निवडणुतीत युतीला बहुमत मिळाले असून देखील त्यांना राज्यात सरकार स्थापन करून शकले नाही. त्यामुळे भाजपला विरोधी म्हणून त्यांनी समाधान माले असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती केली आहे. महाविकासआघाडीच्या रुपाने राज्यासह देशातील जनतेला नवे समीकरण पाहायला मिळाणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे पहिले हिवाळी अधिवेशन असणार आहे.

 

Related posts

मी कंगनाची माफी मागेन जर…संजय राऊतांनी घेतली अट!

News Desk

राम मंदिरासाठी भागवतांनी घातले दगडूशेठला साकडे

Gauri Tilekar

“पण मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की….”

News Desk