HW News Marathi
महाराष्ट्र

चिपळूण येथील मृत कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर

मुंबई । चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मागील वर्षी जुलै महिन्यात पूर परिस्थितीमुळे मरण पावलेल्या 8 कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केली जाईल.

21 आणि 22 जुलै 2021 रोजी पूर आल्याने अपरांत रुग्णालयाच्या कोरोना केंद्रात 8 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता व रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून आर्थिक मदतीची घोषणा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री पकंजा मुंडेंच्या गावात जलयुक्तमध्ये घोटाळा

News Desk

‘त्या’ विधानावर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण….!

News Desk

विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय, ईडीच्या छाप्यावरुन कॉंग्रेसची प्रतिक्रिया 

News Desk