मुंबई | हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाविरुद्ध लढाई जिंकणारच, अशा आत्मविश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. संकटावर मात करुन आपल्याला विजयाची गुढी उभारायची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याचा शुभेच्छा दिला. मुख्यमंत्र्यांनी आज (२५ मार्च) सोशल मीडीयाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरूच राहणार आहेत. भाजीपाल्याची दुकाने सुरूच राहणार आहे, उगाच गर्दी करून नाक, असा विश्वास त्यांनी राज्यातील जनतेला दिला. तसेच हातावर पोट असलेल्यांचे किमान वेतन थांबवू नका, मुख्यमंत्र्यांचे उद्योजक, कंपनी व मालकवर्गाला, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोना सारख्या महामारीशी दोन हात करण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत.
तुम्ही घराबाहेर पडाल तर शत्रू तुमच्या घरात प्रवेश करेल, त्यामुळे तुम्ही घरात राहा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. घरातील एसी बंद करा, सरकारच्या नियमांचे पालन करा, घरात मोकळी हवा येऊ द्या, अशा सूचना ही त्यांनी दिल्या आहेत. सर्वांनी घरात राहा, घरा बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.
संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. गेल्या अनेक वर्ष दिवसानंतर आपल्या कुटुंबातील लोक एकत्र आली आहे. तर आपल्या घरातल्यासोतब वेळ घालवा. आता तुम्ही म्हणाल की, मी काय करतोय मी देखील घरात मिसेस मुख्यमंत्र्यांच ऐकतोय तुम्ही तुमच्या मिसेसचे ऐका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- घरातील एसी बंद करा, सरकारच्या नियमांचे पालन करा
- संकटावर मात करुन आपल्याला विजयाची गुढी उभारायची आहे
- हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाविरुद्ध लढाई जिंकणारच
- ज्येष्ठांची, मुलाबाळांची काळजी घ्या, ही आपली जबाबदारी आहे
- कोरोनाच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आलाय, त्याचा आनंद घ्या
- आपल्याकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा, काळजी करु नका
- तुम्ही घराबाहेर पडाल तर शत्रू तुमच्या घरात प्रवेश करेल
- कोरोनाकडे सकारात्मक बाजूने बघा, घरातले सगळे एकत्र आलेत
- कोरोना म्हणजे न दिसणारा शत्रू, तो तुम्हाला दिसत नाही पण धोका आहे