HW News Marathi
महाराष्ट्र

…तर मी हिमालयात जाईन ! चंद्रकांत पाटलांनी दिलं चॅलेंज

मुंबई | “माझं चॅलेंज आहे. कोल्हापूर विधानसभेची पोट निवडणूक घ्यावी. जर मी निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन”, असे थेट आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या या थेट आव्हानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “जे मला म्हणतात कि मी कोल्हापूरमधून पळून आलो. मी तिथे निवडून आलो नसतो. मात्र मी आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल. मी जर तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन.”

चंद्रकांत पाटील याविषयी बोलताना म्हणाले कि, “मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढविण्यास तयार आहे. मी पुणे हा सुरक्षित मतदारसंघ आहे म्हणून नव्हे, तर पक्षाकडून आदेश आल्यामुळे निवडणूक लढवली होती. आताही माझी कोल्हापूरतून लढण्याची तयारी असून तिथे हरलो तर मी हिमायलात जाईन”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

नितीन गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात – अशोक चव्हाण

News Desk

एसटीच्या” स्मार्ट कार्ड ” योजनेला ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ !

News Desk