HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (१ मे) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेट घेण्यासाठी राजभवनात गेले आहेत. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीत विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करावी, यावर चर्चा होण्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा प्रश्न आता मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात राज्यपालांकडून दिरंगाई होत असल्याच्या मुद्द्यावर याचिका काल (३० एप्रिल) न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत भाजपवर गंभीर आरोप केल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उभयतांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजॉय मेहता, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. राज्यातील विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली आहे.

मंत्रिमंडळाची राज्यपालांकडे केली शिफारस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिलला रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता व तशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करण्यात आली होती. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने २७ एप्रिलला महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर राज्यपालांकडे तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला.

मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याचबरोबर घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आ‌वश्यक आहे. आणि हा सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजे २८ मे पूर्वी ठाकरे यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य होणे बंधनकारक आहे. येत्या २४ एप्रिलला विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. कोरोनामुळे निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणूका लांबणीवर गेल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वन विभागाकडून नरभक्षक वाघिणीची शिकार

Gauri Tilekar

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची केलेली मागणी भाजपाला मान्य आहे का? – महेश तपासे

News Desk

इमारतीचा एका इंचचे बांधकाम अनधिकृत ठरले…!

Aprna