HW News Marathi
महाराष्ट्र

“लवकरच जाहीर सभा घेणार, सभेत मास्ककाढून सर्वचा सोक्षमोक्ष लावणार”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई | लवकरच जाहीर सभा घेणार, सभेत मास्ककाढून सर्वचा सोक्षमोक्ष लावणार, अशा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे. मुख्यमत्र्यांनी बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळा बोलताना म्हणाले. घंटाधारी हिंदुत्व नको आमचे हिंदुत्व हे गदधारी आहे. दादागिरी करून याल तर दादागिरी मोडून काढू, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्यांना टोला लगावला आहे.

बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीची किंमत देत नाही. घंटाधारी हिंदुत्व नको आमचे हिंदुत्व हे गदधारी आहे. हनुमान चालिसा म्हणा, रामदासांनी पण म्हणून ठेवले आहे. भीमरुपी महारुद्रा हे काय असते, हे शिवसेना जर तुम्ही आंगावर आलात तर दाखवायला कमी पडणार नाही. कारण आमचे हिंदुत्व हे हनुमाच्या गदेसारखे गदाधारी आहे. या घरी याचे आहे या आमच्या घरात येवून बोलयाचे असेल. बोलू शकता जरू पण, त्याला एक पद्धत असते. आमच्या घरात दिवाळी असो वा दसरा साधू-संत येतच असतात. शिवसेना प्रमुख आणि माँ होते तेव्हा ही येत होते आणि आताही येतात. पण ते बोलून येतात. पण दादागिरी करून याल, पण दादगिरी कशी मोडायची आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी चांगले शिकविले आहे. 

बिनकामाचे भोंगे वाजयाचे वाजवणाऱ्यांना मी किंमत देत नाही

लवकरात लवकर मी जाहीर सभा घेणार आहे. जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही. तोपर्यंत तुम्ही सुद्धा मास्क काढू नका. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी मास्क बंदी झालेली नाही. लवकरात लवकर मला सभा घेईची आहे आणि त्यात मास्ककाढून बोलयाचा आहे. एकदा काय तो मला सर्वांचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. हे तकलादू हिंदुत्व आलेले आहे नवे हिंदू. काम काही नाही, करायचे काही नाही बिनकामाचे भोंगे वाजयाचे हाच त्यांचा उद्योग आहे. त्यांना मी काडीची किंमत देत नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविणार

News Desk

माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

News Desk

परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं ! उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना…

News Desk