HW News Marathi
महाराष्ट्र

मविआ सरकारचा चहापानाचा कार्यक्रम; विरोधकांचा बहिष्कार, मुख्यमंत्री गैरहजर

मुंबई | हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीने सर्वांसाठी चहापान्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. विरोधकांनी चहापान्यावर कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. चहापान्याच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहात चहापान्याच्या कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी महाविकासकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यवरणमंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आदी मंत्री उपस्थित आहेत.   

राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या (२२ डिसेंबर) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (२१ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडीवर टीका केली. उद्यापासून सुरू होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेश हे महाविकासआघाडी सरकारच्या परंपरेप्रमाणे अधिवेशनाचा कालावधी कमी घेण्यात येणार आहे. यामुळे सरकारला जनतेच्या प्रश्नावर चर्चा टाळता येतील, असे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, आम्ही सभागृहात आमचे ऐकले नाही तर आम्ही सभागृहा बाहेर बोलणार आहोत. तसेच महाराष्ट्रात सरकार अधिवेशन घेण्याची सरकारची मानसिकता नाही. महाविकासआघाडी सरकार लोकशाही कुलुपबंद करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. आणि राज्याचे गृहखाते नेमके कोण चालविते हेच समजत नाही, असे म्हणत फडणवीसांनी दिलीप वळसे-पाटील यांच्यावर टीका केली आहे. हे राज्य सरकार रोखशाही आणि ठोकशाही सरकार आहेत, असे फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अफगाणिस्तानबाबत भारताची भूमिका काय? SCO बैठकीत पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट!

News Desk

“भाजप म्हणतंय की ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर”

News Desk

उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत! – वर्षा गायकवाड

Aprna