HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज घेतले पाच महत्त्वाचे निर्णय

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यापासून त्यांनी एका पाठोपाठ एक निर्णयाचा धडाका लावला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि जिल्हा परिषदांना दिलेल्या निधी स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी नुकताच घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरेतील मेट्रो कारशेडलाच्या कामला त्यांनी स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील सिंचन प्रकल्पांच्या सुधारित मान्यतांचा फेरआढवा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच महाविकासआघाडीने भाजप सरकारप्रमाणेच भाजपच्या काही नेत्यांच्या साखर कारख्यानांना ३१० कोटी रुपयांची बँक हमी निधी रद्द केला आहे. महाविकासआघाडीने आज (११ डिसेंबर) पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यात महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहेत, तसेच राज्यातील दुय्यम न्यायालयातील १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळातील पाच महत्त्वाचे निर्णय

१. राज्यातील दुय्यम न्यायालयातील १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता.
२. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून ५ हजार ३५० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.
३. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय.
४. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी.
५. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता अधिकार. अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यास मान्यता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार अर्णब गोस्वामींवर तातडीने कारवाई करण्यासाठी अरविंद सावंतांचे गृहमंत्र्यांना पत्र

News Desk

शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा !- नाना पटोले

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द आणि बरचं काही….

News Desk