पुणे । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या प्रकरणी, राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे येत असल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, “विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांवर दबाब आहे का?”, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला देखील दिला आहे. “कदाचित, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची नीट माहिती घ्यावी म्हणजे कोणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते त्यांना कळेल”, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस या प्रकरणी बोलताना म्हणाले की, “त्या ऑडिओ क्लिपमध्ये कोणाचा आवाज आहे, हे स्पष्ट आहे. पोलिसांनी ते सांगितलं पाहिजे. या प्रकरणाच्या कारवाईवरून पोलिसांवर दबाव असल्याचं लक्षात येतं आहे. पोलिसांवरील हा दबाव नाहिसा झाला पाहिजे.” तसेच, “मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी. त्या ऑडिओ क्लीप्स नीट ऐकाव्यात म्हणजे कोणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल”, असेही फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणी काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल. जे सत्य आहे ते बाहेर येईलच. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई होईलच. पण गेले काही दिवस, काही महिने एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. असा प्रयत्न होता कामा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये”, मुख्यमंत्री म्हणाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.