HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिकमध्ये भाजपला धक्का ! ५० महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

नाशिक । शिवसेनेने आता नाशिकमध्ये भाजपला जोरदार धक्का दिला आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीच्या तब्बल ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

संजय राऊत यावेळी नाशिकमध्ये बोलताना म्हणाले की, “काल (१३ फेब्रुवारी) राष्ट्रवादीचे नेते, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भेट झाली. नाशिक महापालिकेविषयी चर्चा झाली ती इथे कशी सांगणार ? मात्र, आमचं ठरलंय, नाशिकमध्ये शिवसेनेचाच महापौर बसणार”, असे संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.

संजय राऊत यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यावेळी म्हणाले की, “राज्यपाल हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत.हे राज्यपाल आणि सरकारमधलं शीतयुद्ध नव्हे तर खुलं युद्ध आहे. राजभवनाचा वापर राजकारणासाठी होतोय. मात्र, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मातोश्रीवरील बॉय’ उल्लेखावरून नार्वेकरांनी राणेंना चांगलेच सुनावले

Aprna

एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

Manasi Devkar

राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे – संजय राऊत

News Desk