HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू, ‘या’ नेत्यांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता

मुंबई | राज्यात महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहे. उद्धव ठाकरेंसह सह मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, अद्याप ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार त्यावर अद्याप माहिती मिळाली नाही. या पाश्वभूमीवर आज (४ डिसेंबर) दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे.

ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात येण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर गृह खात्यांची जबाबदारी कोणत्या नेत्याकडे सोपविण्यात येणार याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदेंना आरोग्य मंत्रालय, सुभाष देसाईंच्याकडे पुन्हा उद्योग मंत्रालय, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तर काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा पदभार सोपवला जाण्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

उपमुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ आणि सार्वजनिक बांधकाम ही तीन महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला एकूण १० कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्रिपदे मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काँग्रेसला महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय ही मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. शिवसेनेच्या वाट्याला रस्ते विकास, आरोग्य यासारख्या मंत्रिपदांचा कार्यभार येऊ शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेते पदी निवड

swarit

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी

News Desk

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील! – मुख्यमंत्री

Aprna