HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज पुणे दौरा, कोरोनास्थितीचा घेणार आढावा

पुणे | पुणे | पुण्यात दिवसेंदिवस गंभीर होत चालेल्या कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (३० जुलै) पुण्याचा दौरा करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री पुण्यातील कोरोनास्थितीचा संपूर्ण आढावा घेतील. सकाळी ९.३० च्या सुमारास मुख्यमंत्री आपल्या या पुणे दौऱ्यासाठी निघाले आहेत. विशेष म्हणजे, या दौऱ्याकरिता मुख्यमंत्री स्वतः ड्राइव्ह करत निघाले आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे कोरोनाच्या या संपूर्ण काळात सुरुवातीपासून पुण्यातील स्थितीकडे पूर्ण लक्ष ठेवून आहेत. मात्र, आता स्वतः मुख्यमंत्री पुण्याचा दौरा करून सद्यस्थितीचा आढावा घेतील.

https://www.facebook.com/hwnewsmarathi/posts/1006588853107911

मुख्यमंत्र्यांनी पुण्याकडे लक्ष द्यावे. राज्य सरकारचे पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे म्हणत विरोधकांनी पुण्यावर अन्याय होत असल्याची टीका केली होती. त्याचप्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पुण्याला आर्थिक मदत मिळण्याची देखील मागणी वारंवार होत आहे. त्यातच पुण्यातील कोरोनास्थिती पुन्हा एकदा गंभीर झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांचा हा पुणे दौरा निश्चित करण्यात आला. मुख्यमंत्री आज दिवसभर आढाव्यासह पुण्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह कोरोनाविषयक बैठक घेतील.

मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका भाजपकडून वारंवार झाली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी “मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील कोरोनास्थितीकडे देखील लक्ष द्यावे”, असा सल्ला देखील दिला होता. त्याचप्रमाणे, “मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पुण्यातील कोरोनास्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्यानंतरचा हा मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा म्हणजे एक दिखावा आहे”, अशी बोचरी टीका पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. “मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे नाटक न करता पुण्याला ५०० कोटींची मदत जाहीर करावी”, अशी मागणीही मुळीक यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ब्लॅक फंगसविरुद्ध लढण्यासाठी टाळ्या अन् थाळ्या वाजविण्याची घोषणा मोदी करतीलच’ राहूल गांधींचा टोला

News Desk

ग्रीन झोनमधील दारुच्या दुकानांना केंद्राचा ग्रीन सिग्नल

News Desk

तर दिल्लीत ३१ जुलैपर्यंत ५ लाखांहून अधिक रुग्ण वाढू शकतात

News Desk